रविवारी कुंभार समाजातील गुणवंतांचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शहर जिल्ह्यातील कुंभार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवार दि.५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आले आहे.अत्तापर्यंत समाजातील हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.यावर्षीही समाजातील ७५ टक्केहून अधिक गुण घेतलेल्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या प्रांगणात होणार असून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थित रहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.संपर्क विठ्ठल कुंभार (९४२३५२७०७१), चंद्रकुमार कुंभार (९३७००२०३९६)

No comments:
Post a Comment