ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

 ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

तीन गोडवूनसह एक बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उघडकीस



      सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चिंचोली एमआयडीसी ता. मोहोळ हद्दीत या ठिकाणी बनावट देशी दारु निर्मितीचा कारखान्यावर दि. 29 जुलै 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत 2 कोटी 1 लाख 45 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी आखलेल्या विविध विभागांच्या समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर  निर्देशानुसार व  राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत एकुण ४१३ बॉक्स यामध्ये ९० मिलीच्या टँगो पंच बनावट देशी मद्याच्या ४१३०० सिलबंद बाटल्या, भिंगरी देशी दारु ९० मि.ली. क्षमतेच्या २००० बाटल्या एकुण २० बॉक्स, एकुण ३८९७ ब.लि. व २०० मि.ली. क्षमतेचे स्पिरीटचे ६९ बॅरेलमध्ये १३८०० लि. स्पिरीट, तयार ब्लेंड १२०० लि., बनावट प्लॅस्टीक बाटल्याचे ३२६ बॉक्स, विविध बॅन्डचे बनावट लेबल १६५०३५, विविध बॅन्डचे बनावट बुचे १३५३०००, ऑटोमॅटीक बॉटलिंग मशिन ०१, सेमी ऑटोमॅटीक बॉटलिंग मशिन ०१, स्मॉल इंजेक्ट प्रिंटर ०२, आरओ प्लांट ०५, जनरेटर ०१ व इलेक्ट्रीक मोटर ०४, टँगो बॅन्डचे रिकामे कागदी बॉक्स २९७५०, विवध कंपनीचे ०६ मोबाईल संच, तसेच बनावट देशी मद्य निर्मितीसाठी लागणारे आवश्यक इतर साहित्य. तसेच सदर गुन्हयात ०४ चारचाकी वाहने यात ०२ पिकअप व ०२ कारचा समावेश असुन ०३ दुचाकी वाहने अशी एकुण ०७ वाहने असा मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ५ आरोपींना अटक करण्यात आली असुन रु.२ कोटी १ लाख ४५ हजार २८५ रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
           सदर बनावट देशी मद्य निर्मितीमुळे .७० लाख ४० हजार ५८७  एवढ्या शासकीय महसुलाची हाणी झाली आहे. सदर कारवाईसाठी एमआयडीसी मधील भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या गोडावूनचा वापर करण्यात आला असुन जागामालक यांना देखील सह आरोपी करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाची आजपर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. सदर बनावट मद्याचा पुरवठा सोलापूरसह शेजारील जिल्हयात (बीड, लातूर, धाराशिव) करण्यात येत होता.

            यापूर्वी माहे एप्रिल ते ३० जुलै २०२६ या कालावधीत परराज्यातील (गोवा) मद्यावर १० गुन्हे नोंदवून १४ आरोपी, ६९७६ ब.लि. मद्य, ०६ वाहने असा एकुण १ कोटी ४२ लाख १६ हजार ६८०  किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दरम्यानच्या कालावधीत बनावट देशी / विदेशी मद्यावर १२ गुन्हे नोंदवून २० आरोपी, ४१०५६ ब.लि. बनावट देशी मद्य, २५३ ब.लि. बनावट विदेशी मद्य, १३८०० लि. स्पिरीट, १२०० लि. तयार ब्लेंड, १२ वाहने असा एकुण २ कोटी ११ लाख ३२ हजार ३२५  किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

       सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे निरीक्षक जे.एन.पाटील,.ए.व्ही. घाटगे, दुय्यम निरीक्षक आर. के. निंबाळकर,.डी. आर. पोवार,.ए.बी.सरवदे, एस.बी.सिद, .एस.बी. शेळके,.एस.डी. कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, जवान अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपील स्वामी, आण्णा कर्चे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, महिला जवान श्रीमती शेरखाने तसेच जवान-नि-वाहनचालक श्रीमती. सलगर, सानप, वाघमारे, नवले व अकार्यकारी घटकावरील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली आहे.

तसेच अवैध ढाब्यावर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती, वाहतुक, ती जवळ बाळगणे यासाठी वापरण्यात येणा-या जागा मालक यांनाही सदर कारवाईत आरोपी करण्यात येणार आहे. मिथेनॉलयुक्त बनावट दारुमुळे पुणे येथील दुर्घटनेत लोकांचे दुदेर्वी मृत्यु झाले आहे. तरी सदर प्रकारच्या विषारी दारु मुळे किडनी निकामी होणे, कामस्वरुपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यु असे गंभीर दुष्परिणाम संभवतात. नागरिकांनी अश्या कुठल्याही अमिषांना बळी न पडण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

           नागरिकांनी आपल्या परिसरात कोठेही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट इत्यादी तत्सम पदार्थ, द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतुक, विक्री होत असल्यास त्याची माहिती टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे  आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages