माढ्यातील सह्याद्री संस्थेकडून वारकर्याना मोफत चप्पलचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

माढ्यातील सह्याद्री संस्थेकडून वारकर्याना मोफत चप्पलचे वाटप

 माढ्यातील सह्याद्री संस्थेकडून वारकर्याना मोफत  चप्पलचे वाटप 



माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील फक्त सह्याद्री  बहुउद्धेशीय संस्थेच्या वतीने माढा मार्गे  पंढरपूरकडे पायी चाललेल्या वारकर्याना चप्पलचे मोफत वाटप करण्यात आले.


पापनस-  माढा मार्गे मराठवाड्यातील हजारो महिला पुरुष वारकरी पालखी सोहळ्यात  पायी वाट चालत  आषाढी वारीसाठी  श्री पाडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत.
वारकर्याचे  चालताना पाय दुखी नयेत याकरिता आरामदायी  आणी नामवंत कंपनीच्या महिला- व पुरषांना चप्पलचे मोफत वाटप  करण्यात आले.

पंढरपुरच्या वारी दरम्यान चहा,बिस्कीट,सह अन्नदान केले जात असल्याचे आपल्याला सर्वत्र पहायला मिळते.मात्र सह्याद्री संस्थेने वारकर्याना चप्पलचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी शिंदे,शारदा शिंदे,
संदीप शिंदे,जयदीप शिंदे,धनश्री शिंदे,भाग्यश्री शिंदे,निकीता जाधव,शुभांगी गवळी,शिवतेज शिंदे,संदेश शिंदे,शिवकन्या शिंदे,यश जाधव,प्रमोद जगताप,
भारत भिसे,रणजित गायकवाड सह अन्य नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages