आषाढी दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना इशारा; 'अजितदादा' प्रकरणाची चौकशी करा - प्रभाकर देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 24, 2026

आषाढी दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना इशारा; 'अजितदादा' प्रकरणाची चौकशी करा - प्रभाकर देशमुख

आषाढी दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना इशारा; 'अजितदादा' प्रकरणाची चौकशी करा - प्रभाकर देशमुख 

प्रलंबित मागण्यांसाठी काळे झेंडे दाखविणार
महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा इशारा

 





पेनूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असताना स्वर्गीय अजित (दादा) पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात संशयास्पद मृत्यू झाला; तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील करोडो नागरिकांच्या मनात अजितदादांचा अपघात की घातपात घडवून मृत्यू झाला असल्याचा संशय आहे. विमानात बसून जाईपर्यंतचे CCTV फुटेज अजूनही मिळत नाहीत. त्यामुळे यासह इतर बाबीही संशयास्पद असल्याने त्या कंपनीच्या विमान मालका वरती व इतर संशयतांवरती त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख यांनी केली आहे.

त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर दौऱ्यावेळी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी व जनहिताच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी वेळ, पास व प्रत्यक्ष भेट मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन पाठविण्यात आले असून, मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस आपण आजित दादा पवार यांचे जीवलग मित्र असल्याचे सातत्याने सांगत आहात. तुमच्या कार्यमुळे व योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रतील कायदा सुव्यस्था व्यवस्थित आहे, असे ही सातत्याने सांगत आहात. तसेच आपण उन्हाळी अधिवेशना मध्ये स्वतः आत्मविश्वासाने आजितदादाच्या मृत्यूची चौकशी लावण्यासाठी आकाश पातळ एक करू असे जाहिर आश्वासन राज्यातील करोडो जनतेला दिले होते. तुम्ही दिलेला शब्द पाळणारा नेता आहे म्हणून अख्खा महाराष्ट्रातील भाजपचे नेते व तुमचे कार्यकर्ते सांगत असतात. त्यामुळे संबधितावर त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावा व राज्यातील जनतेला न्याय दयावा.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील शेतकरी सलग दुष्काळ, अवकाळी पाऊस, शेतीमालाला मिळणारे कमी दर आणि वाढते कर्ज यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे म्हटले आहे. अनेक शेतकरी कर्जफेड करण्यास असमर्थ असून, सरकारने तातडीने व्यापक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली ती सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. उदा,ः- शेतकऱ्यांच 5 लाख किंवा. 3 लाख कर्ज आहे परंतु कोणतीही अट न घालता त्यातील सरसकट 2 लाख कर्ज माफी जाहीर करावी. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यां शेतकाऱ्यांना प्रामाणिकपणा केल्यामुळे २ लाखाची प्रोत्साहन पर अनुदान द्यावे.

 गेल्या पाच महिन्यापासून. महावितरण कंपनीने सिंगल फेज लाईट रात्री गरजेच्या किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दरम्यान सायंकाळी 6 ते 10 पर्यंत बंद ठेवल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास होत आहे तरी सिंगल फेज सायंकाळी 6 ते सकाळी 8 पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित. खरीप पीक विम्याबाबत कोणतीही अट न लावता. प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाई देण्यात यावी.

63 चे डीपी वरती लोड असल्यामुळे जळण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे एडिशन डिपी साठी. आमदार व खासदारांनी शेकडो पत्र दिलेले आहेत परंतु निधी अभावी अधिक डीपी देण्यासाठी विलंब लागतो त्यामुळे स्वतंत्र निधी आमदार व खासदारांसाठी उभा करण्यात यावा. स्वातंत्र्य निधीचा कोटा आमदार व खासदारांना द्यावा.

(NEET) परीक्षा मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्यातील शिक्षण मोफत देण्यात यावे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री स्वर्गीय अजित (दादा) पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान भीषण अपघातात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची चर्चा लाखो नागरिकांमध्ये आहे. आजित दादा जेथे होते तेथून विमानात बसेपर्यंत CCTV फुटेज नाहीत. विमानात बसून जाईपर्यंतचे CCTV फुटेज नाहीत. त्यामुळे यासह इतर बाबी संशयास्पद असल्याने त्या विमान कंपनीच्या मालिकांसह इतर संशयितांविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. असे ही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, राज्याचे प्रवक्ते राम भाऊ पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष गणेश चवरे तसेच युवक जिल्हा पदाधिकारी शरद भोलेकर यांनी या आंदोलनाची माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages