मोफत विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी कॉंग्रस पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रस पक्ष व वसंतदादा काळे मेडिकल फाउंडेशन संचलित, जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर यांच्या वतीने विश्वविक्रमी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे यांनी दिली.
या आरोग्य शिबिराची सुरुवात आज दि.२२ जुलै रोजी आषाढी यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या वारकरी भाविकभक्तांची मोफत आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करून त्यांना गोळ्यांचे वितरण करण्यात आले. हे शिबीर दि.२२ व २३ जुलै या कालावधीत मौजे भंडीशेगाव येथे चालविले जाणार असून याचा भाविकभक्तांनी लाभ घ्यावा तसेच दि.२५,२६ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरात विविध भागात आयोजित करण्यात आले आहे.असे अवाहन या वेळी करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी स.शि.वसंतराव काळे स.का.चे संचालक राजाभाऊ माने व नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या विद्या कुचेकर डॉ.पद्मराजे माने, गणेश पाटील तसेच जनकल्याण हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स, स्टाफ व संस्थेच्या अंर्तगत येणाऱ्या नर्सिंग कॉलेजच्या सर्व विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले आहे.

No comments:
Post a Comment