अनगरच्या पाटील विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर येथे राजर्षी शाहू महाराज जयंती तसेच सामाजिक न्याय दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महादेव पवार यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचे महत्त्व विशद करत समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देणे, हाच त्यांच्या कार्याचा मुख्य संदेश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक चोपडे, उपमुख्याध्यापक माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके ,परमेश्वर थिटे,सोमनाथ गुंड,गोरख गायकवाड,डाॅ. प्रशांत कुलकर्णी , बापुराव घुले तसेच शिक्षकेतर कर्मचारी शहाजी थिटे, महादेव भडकवाड आणि विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments:
Post a Comment