'आंतरराष्ट्रीय विधवा दिन' जिल्हा परिषदेत कार्यशाळेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

'आंतरराष्ट्रीय विधवा दिन' जिल्हा परिषदेत कार्यशाळेचे आयोजन

'आंतरराष्ट्रीय विधवा दिन' जिल्हा परिषदेत कार्यशाळेचे आयोजन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाजातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणीक, कायदेशीर, आरोग्य विषयक पुनर्वसनासंबंधी प्रश्नांचा विचार करून शासन आपल्या दारी अंतर्गत मिशन वात्सल्य योजना सुरु केली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते.

 दरवर्षी 23 जून हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय एकल महिला सन्मान दिन' म्हणून पाळला जातो. समाजातील विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा त्यांना थेट लाभ मिळून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण व्हावे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महिला बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, महिला बालकल्याण समिती सदस्य चैताली मुळे, करुणा शिवशरण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन विधवां संदर्भातील अनिष्ट प्रथा बंद करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या सर्व बाबींचा विचार करता, आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून आणि एकल महिला धोरण अनुषंगाने पुणे विभागातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर राबविणेबाबत विभागीय आयुक्त यांच्या सूचना आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages