बँक ऑफ महाराष्ट्र व बी.बी.एन च्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

बँक ऑफ महाराष्ट्र व बी.बी.एन च्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

 बँक ऑफ महाराष्ट्र व बी.बी.एन च्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बँक ऑफ महाराष्ट्र व बी बी एन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात आदर्श कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांची उपस्थिती होती याच दिवसाचे अवचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून खास बँकेच्या विविध योजना ज्या की घरासाठी कर्ज वाहनासाठी, शिक्षणासाठी, परदेशी गुंतवणूक परदेशी चलन त्याचबरोबर गोल्ड व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती देऊन ग्राहकांना व आपल्या नव्या ग्राहकांसमोर या योजनांची माहिती देण्यात आली या कार्यक्रमास क्षेत्रीय कार्यालयाचे *मुख्य प्रबंधक मेथिलेश पांडे त्याचबरोबर सीपीसीचे इन्चार्ज प्रणय शंभरकर त्याचबरोबर बीबीएनचे समन्वयक विश्वनाथ कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व ग्राहक खातेदार यांच्याशी बँकिंग विषयी ची माहिती व त्याचा लाभ कशा प्रकारे घेता येईल याबद्दल सविस्तर असे मनोगत व्यक्त केले आणि बँक ऑफ महाराष्ट्र च्या माध्यमातून एक आव्हान केले की येणाऱ्या काळात आम्ही बँकेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक सभासद ग्राहक तथा खातेदारांशी माहिती देऊ व जास्तीत जास्त संख्येने बँक ऑफ महाराष्ट्रशी जुडता येईल यासाठी सतत प्रयत्न करत राहू या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँक ऑफ महाराष्ट्रचे स्टाफ विभागाचे प्रमुख निलेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल कुलकर्णी यांनी केले व या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्यांचे बहुमलाचे आगमन व बँक ऑफ महाराष्ट्रशी असणारे जुने नाते असेच पुढेही इतक्याच आत्मीयतेने सांभाळून ठेवू असे प्रतिपादन केले.
  त्याचबरोबर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी बँकेचे कर्मचारी तथा अधिकारी त्याचबरोबर बी बी एन चे सर्व सभासदांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages