जनतेला लुटणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील विविध भागात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करण्याचे ऐवजी कारवाईच्या नावाखाली जनतेची लूट करीत आहेत त्यामुळे अशा वाहतूक कर्मचाऱ्यांना समज देऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
सोलापूर - सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस विस्कळीत होत चालली आहे. रस्त्यांवरील खड्डे, अनियोजित पार्किंग, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी कारवाई आवश्यक असली, तरी अनेक नागरिकांमध्ये कारवाईच्या नावाखाली अन्यायकारक दंड आकारला जात असून
प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे, जनजागृती करणे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक कर्मचारी काही वेळा उपस्थित नसतात अनेक वेळीअवेळी गल्लीबोळ्यामध्ये आठ आठ दहा वाहतूक पोलीस कर्मचारी दंडात्मक कारवाईकडेच जास्त लक्ष देत आहेत. पोलीस आयुक्तांनी शहर हद्दीतील सर्व वाहतूक कर्मचाऱ्यांना आधी पोलीस मग नागरिक या उपक्रमाने सूचना देऊन सुद्धा अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी हेल्मेट सक्तीचे पालन करीत नाहीत .अनेक वाहतूक पोलिसांकडे लायसन्स पियुसी सर्टिफिकेट विमाचे कागदपत्र नाहीत. पोलीस व वाहतूक पोलीस कर्मचारी मॉडीफाय सायलेन्सर असलेले बुलेट चा वापर बिनधास्तपणे करीत आहेत अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचारी खाजगी मोबाईल मध्ये फोटो काढून नियमबाह्य दंड आकारणी करत आहेत परराज्यातील येणाऱ्या खाजगी गाड्यावर अनेक ठिकाणी कागदपत्राच्या तपासणीच्या नावाखाली त्यांची अडवणूक करून पिळवणूक करीत आहेत त्यामुळे इतर राज्यातील जिल्ह्यांमध्ये सोलापूरचे प्रतिमा खराब होत आहे. व काही वाहतूक पोलीस कर्मचारी आडोशाला थांबून रस्त्याच्या मध्यभागी अचानक येऊन वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई किंवा थांबणे यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो वाहन चालकांची अचानक होणारी तारांबळ, अचानक ब्रेक दाबणे आणि अनपेक्षितपणे वेग कमी होणे या गोष्टींमधून मागे येणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघातांचे प्रमाण वाढल्याचे अनेकदा दिसून येत आहे तरी सोलापुरातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अरेरावीच्या भूमिकेला व नागरिकांना कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली कायदेशीर लूट करणाऱ्या व दंड न भरता थेट खिसे भरण्याचे प्रकार काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत अश्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना कडक समज देण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले संपर्कप्रमुख छत्र गुण माने उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रम वानकर दक्षिण कोल्हा सोलापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन नदाफ जिल्हा संघटक विशाल साळुंखे प्रकाश डोंगरे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment