समाजसेवेची आवड असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड; जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनची अहमदनगर, मध्यप्रदेश व सोलापूर कार्यकारिणी जाहीर......
सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. दिगंबर शेळके, मध्यप्रदेश अध्यक्षपदी गौरव मित्तल यांची नियुक्ती
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- समाजसेवेची तळमळ, मानवाधिकार संरक्षणाची जाणीव आणि वंचित, पीडित व दुर्बल घटकांसाठी कार्य करण्याची बांधिलकी असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड करत जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन (भारत सरकार पंजीकृत) यांनी विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
पंढरपूर येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी, पंढरपूर शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. दिगंबर शेळके, नेवासा तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय काटे तसेच मध्यप्रदेश राज्याध्यक्षपदी गौरव मित्तल यांची नियुक्ती जाहीर केली. या सर्व नियुक्त्यांना राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र राज्य कमिटीची मान्यता प्राप्त झाली आहे.
तसेच संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. सादिक शेख यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. हरिभाऊ प्रक्षाळे यांनी रविवार दि. २८ जून २०२६ रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पाचव्या राष्ट्रीय अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली. राज्यभरातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सदस्य, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र तुकाराम आहेर यांच्या नेतृत्वाखाली संघटना गेल्या पाच वर्षांपासून वंचित, पीडित, शोषित व दुर्बल घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन संघटनेने अनेक सामाजिक, जनजागृती, मानवाधिकार संरक्षण व लोकहिताचे उपक्रम राबविले आहेत.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मानवाधिकार चळवळीला अधिक बळकटी देत समाजातील वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांच्या न्याय व अधिकारासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात विविध सामाजिक, शैक्षणिक, जनजागृती व मानवाधिकार संरक्षणाशी संबंधित उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या हातून समाजातील गोरगरीब, वंचित, पीडित व गरजू जनतेची सेवा घडावी, मानवाधिकार संरक्षणाची चळवळ अधिक बळकट व्हावी आणि संघटनेचे कार्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

No comments:
Post a Comment