महेंद्र भोगडे यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरु - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

महेंद्र भोगडे यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरु

महेंद्र भोगडे यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरु



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूर, प्रसाद नगर येथील हनुमान मंदिरात कै. महेंद्र अशोक भोगडे यांच्या स्मरणार्थ मोफत वाचनालय सुरु करण्यात आली आहे.
अशोक भोगडे यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ वाचनालयाच्या बांधकामासाठी एक लाख रुपये तर पुस्तक व वर्तमानपत्रासाठी पन्नास हजार दिले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष शंकर कांबळे, वालजीभाई गामी, इरय्या मठपती,  बाजीराव वाघमारे, राजशेखर स्वामी, शंकरय्या स्वामी, छायाबाई हिरेमठ व अन्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रसाद नगर परिसरातील वाचकांना व ज्येष्ठ नागरिकांना वाचन करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मदत होण्यासाठी वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून पुर्णपणे मोफत आहे.भविष्यात ग्रंथाची संख्या वाढवून लोकोपयोगी कार्य करणार असल्याचे अध्यक्ष शंकर कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages