वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर
 आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी





दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी  नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मौजे वडाळा ( ता. उत्तर सोलापूर) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. पत्रामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील सुमारे ३५ गावांतील नागरिकांना शेती, जमीन वाटप, जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी शहरातील तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार होऊन राज्यात नव्याने ६९ अप्पर तहसील कार्यालये निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली, त्यामध्ये वडाळा येथील कार्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांची महसूल विभागातील कामे अधिक जलद, सुलभ आणि स्थानिक पातळीवर होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी  नागरिकांना शासनाच्या सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील,असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages