पेनूरचे ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे यांना मातृशोक; सौ. तारामती चवरे यांचे निधन
पेनूर(कटूसत्य वृत्त):- पेनूर (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. रामदास भाई चवरे यांच्या मातोश्री सौ. तारामती महादेव चवरे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पेनूर व मोहोळ परिसरात शोककळा पसरली आहे. सौ. तारामती चवरे या अत्यंत मिळूनमिसळून राहणाऱ्या आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. मोहोळचे माजी उपसभापती मानाजी बापू माने यांच्या त्या भगिनी होत्या.
त्यांच्या पश्चात २ मुले, ५ मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. चवरे परिवाराच्या या दुःखात स्थानिक ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभागी होऊन चवरे व माने परिवाराचे सांत्वन केले आहे.

No comments:
Post a Comment