सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक-२ ची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा समाजकल्याण केंद्र, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेला संस्थेचे सभासद, पदाधिकारी व संचालक मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रणजित घोडके होते. सेवानिवृत्त ज्येष्ठ सभासद क्षीरसागर, वासुदेव घाडगे आणि पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात चेअरमन रणजित घोडके यांनी संस्थेच्या ६२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेच्या आर्थिक प्रगतीसह सभासदांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सचिव बापूराव जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी संचालक गिरीष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, तर व्हाईस चेअरमन शशिकांत साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास संचालक श्रीकृष्ण घंटे, प्रदीप सगट, सुधाकर माने-देशमुख, श्रीकांत धोत्रे, शिवाजी कांबळे, अंकुश कोळेकर, मोहन यादव, दिनेश बनसोडे, समीर शेख, भिमाशंकर वाले, महेश जाधव, संगीता हांडे, राणी सुतार यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव बापूराव जगताप, संतोष जाधव, शामराव बोरगे आणि उमाकांत शाहापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
No comments:
Post a Comment