प्रभाग २२,२३‎ आणि‎ प्रभाग ६ च्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी किसन‎ जाधव यांची प्रभावी मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

प्रभाग २२,२३‎ आणि‎ प्रभाग ६ च्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी किसन‎ जाधव यांची प्रभावी मागणी

 प्रभाग २२,२३‎ आणि‎ प्रभाग ६ च्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी किसन‎ जाधव यांची प्रभावी मागणी





सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग क्रमांक‎ २२,‎ २३ आणि‎ प्रभाग ६‎ मधील नागरिकांना‎ स्वच्छ, निर्मळ,‎ उच्च‎ दाबाने‎ व नियमित पाणीपुरवठा‎ व्हावा, तसेच‎ वाढत्या लोकसंख्येचा‎ व प्रभागाच्या‎ विस्ताराचा विचार करून नवीन‎ पिण्याच्या पाण्याच्या‎ टाकीची‎ उभारणी करण्यात‎ यावी, अशी ठाम‎ मागणी‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांनी शनिवारी झालेल्या‎ प्रभाग‎ २२,२३‎ आणि‎ ६ च्या झोन‎ क्रमांक ६‎ च्या‎ अंतर्गत‎ बैठकीत केली.‎ स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस‎ महापौर‎ विनायक कोंडयाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते,‎ प्रभाग‎ २२ च्या‎ नगरसेविका‎ चैत्राली‎ गायकवाड,प्रभाग‎ २३‎ चे‎ नगरसेवक‎ राजशेखर पाटील, सत्यजित वाघमोडे,‎ प्रभाग‎ क्रमांक ६‎ च्या‎ नगरसेविका सोनाली गायकवाड,‎ नगरसेवक ऋषिकेश मेट्रे,‎ सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज‎ गायकवाड,महादेव अण्णा गवळी,अर्जुन‎ गायकवाड,‎ पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख‎ व्यंकटेश चौबे, झोन क्रमांक ६‎ चे‎ विभागीय‎ अधिकारी‎ पानगल,पीएची विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी‎ आदी उपस्थित होते.‎ यावेळी नगरसेवक किसन जाधव‎ म्हणाले,‎ प्रभाग क्रमांक‎ २२ व २३ मधील‎ नागरिकांना‎ अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित‎ पाणीपुरवठ्याचा‎ सामना करावा‎ लागत‎ आहे.‎ नागरिकांची‎ ही समस्या‎ तातडीने सोडवून‎ त्यांना‎ नियमित,‎ स्वच्छ‎ व‎ उच्च दाबाने पाणी‎ मिळणे‎ ही महापालिकेची‎ जबाबदारी आहे. तसेच प्रभागाचा‎ वाढता‎ विस्तार‎ लक्षात‎ घेता नवीन पाणीटाकी उभारणे‎ अत्यावश्यक झाले आहे. यावर‎ पाणीपुरवठा विभागाचे‎ प्रमुख व्यंकटेश‎ चौबे‎ यांनी‎ संबंधित अधिकाऱ्यांकडून‎ तांत्रिक‎ बाबींचा‎ आढावा घेऊन‎ आवश्यक‎ उपाययोजना‎ तातडीने करण्यात येतील,‎ तसेच नागरिकांना अधिक‎ चांगला व‎ सुरळीत‎ पाणीपुरवठा करण्यासाठी‎ विभाग सकारात्मक‎ असल्याचे सांगितले.‎ महापौर‎ विनायक‎ कोंडयाल यांनीही‎ या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका‎ घेत‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२, २३ आणि प्रभाग‎ ६‎ मधील‎ नागरिकांना‎ स्वच्छ, निर्मळ आणि उच्च‎ दाबाने‎ नियमित‎ पाणीपुरवठा‎ मिळावा यासाठी‎ महानगरपालिका कटिबद्ध‎ आहे. आवश्यक उपाययोजना करून येत्या काही दिवसांत‎ ही कामे‎ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल,‎ अशी ग्वाही‎ नगरसेवक किसन‎ जाधव यांना‎ दिली. सोलापूर शहरातील‎ पाणीपुरवठा योजनेसाठी १३७५ कोटी रुपये‎ मंजूर‎ झाले‎ ह्या‎ अंतर्गत‎ ही बैठक‎ पार‎ पडली.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages