बार्शीतील सचिन वायकुळे लिखित 'तिमिर छेदताना' ग्रंथाला साहित्यकृती पुरस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

बार्शीतील सचिन वायकुळे लिखित 'तिमिर छेदताना' ग्रंथाला साहित्यकृती पुरस्कार

 बार्शीतील सचिन वायकुळे लिखित 'तिमिर छेदताना' ग्रंथाला साहित्यकृती पुरस्कार



 

बार्शी (कटूसत्य वृत्त):- राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीनिमित्त येथील लेखक सचिन वायकुळे लिखित ' तिमिर छेदताना ' या चारित्र ग्रंथाला पुण्यातील राजर्षी शाहू महाराज प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार देऊन पुण्यात सन्मानित करण्यात आले.
राजर्षी शाहू मल्टीपर्पज फाउंडेशन, सर्किट  बेंच फाउंडेशन  व शांतिदूत परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा हा प्रेरणादायी साहित्यकृती पुरस्कार  पुण्यातील पत्रकार भवन येथे पार पडला.
बार्शीचे लेखक वायकुळे यांनी  "तिमिर छेदताना" या ग्रंथातून एका अनाथ व्यक्तीच्या यशस्वी जीवन चरित्राचा वेध घेत सामाजिक जाणीव, संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे मांडला आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजविणारे आणि प्रेरणा देणारे लेखन केल्याबद्दल वायकुळे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान आला.
 यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहत राज्यसभेच्या खासदार डॉ.ज्योती वाघमारे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पद्मश्री उदय देशपांडे, सर्किट  बेंच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.सुरेश राठोड, शांतिदूत परिवाराचे प्रमुख तथा निवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages