शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 11, 2026

शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! !

 शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीसाठी  आझाद मैदान, मुंबई येथेआंदोलन ! !



मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य वरीष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघाच्या वतीने शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरतीच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत  धरणे आंदोलन  करण्यात आले.


आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, शासनाने सन २०१७ पासून आजतागायत  शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांची भरती केलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक अनुदानित व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ही महत्त्वाची पदे रिक्त असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा विकासावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

शासनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदके मिळवायची आहेत, "खेलो इंडिया" सारख्या योजनांद्वारे क्रीडा संस्कृती रुजवायची आहे, मात्र खेळाडू घडविणाऱ्या शारीरिक शिक्षण संचालकांचीच भरती करण्यास शासन उदासीन असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. "सरकारला मेडल हवे आहेत, पण ते घडवणारे प्रशिक्षित क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण संचालक नको आहेत," अशी तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

महाविद्यालयांना शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल ही पदे बंधनकारक असताना आणि या पदांशिवाय मान्यता मिळत नसताना, शासनाने इतर सर्व विषयांच्या एकूण ५०१२ पदांना मान्यता दिली; मात्र शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांना या भरती प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरातील पीडित उमेदवार आणि कार्यरत शिक्षक विविध मार्गांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मोर्चे, धरणे आंदोलने, निवेदने आणि उपोषणाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलन नजीकच्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पदभरतीच्या प्रश्नाबाबत आवश्यक निर्णय घेणे व शासनापर्यंत वस्तुस्थिती पोहोचविण्यात दिरंगाई होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

राज्यातील युवकांचे भविष्य, महाविद्यालयीन क्रीडा विकास आणि राष्ट्रीय स्तरावर सक्षम खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदांची भरती तातडीने करण्यात यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महासंघाने दिला आहे.

"क्रीडा क्षेत्र वाचवा – शारीरिक शिक्षण संचालक भरती करा!"

"रिक्त पदे तात्काळ भरा – विद्यार्थ्यांना न्याय द्या!"

डाॅ.गणेश सिंहासने, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक महासंघ.

"शासनाला पदके जिंकणारे खेळाडू हवे आहेत, पण ते घडवणारे शारीरिक शिक्षण संचालक नकोत, ही दुर्दैवी बाब आहे. २०१७ पासून प्रलंबित असलेली शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल पदभरती तात्काळ सुरू करून राज्यातील हजारो पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, ही आमची शासनाकडे मागणी आहे."

"मी पीएसआय पदाची नोकरी सोडून क्रीडा क्षेत्रावरील प्रेम आणि विद्यार्थ्यांसाठी काम करण्याच्या उद्देशाने शारीरिक शिक्षण संचालक हे क्षेत्र निवडले. मात्र, शासनाने या पदभरतीबाबत घेतलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे आमच्यासारख्या अनेक पात्र उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. खेळाडू घडविणाऱ्या पदांनाच न्याय मिळत नसेल, तर राज्याच्या क्रीडा विकासाला मोठा फटका बसणार आहे."


– शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सायकलपटू,

'घाटांचा राजा' सन्मानित खेळाडू

शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय सायकलपटू यांची प्रतिक्रिया डाॅ.  संघर्ष शृंगारे यांनी दिली. राज्यातील पात्रता धारक शारीरिक शिक्षण संचालक व ग्रंथपाल शासन निर्णयाच्या प्रक्रियेसाठी सतत पाठपुरावा करत आहेत. सदर संघर्षामध्ये राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages