श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था; चेअरमनपदी देवकुळे यांची बिनविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 10, 2026

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था; चेअरमनपदी देवकुळे यांची बिनविरोध निवड

 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था; चेअरमनपदी देवकुळे यांची बिनविरोध निवड




नातेपुते (कटूसत्य वृत्त) :- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादितच्या चेअरमनपदी नारायण मच्छिंद्र देवकुळे तर व्हाईस चेअरमनपदी सविता संजय रणदिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर कार्यालयात झालेल्या विशेष सभेत करण्यात आली.

संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा सोमवार, दि. 8 जून रोजी सकाळी 11 वाजता तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पंढरपूर यांच्या कार्यालयात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस. टी. तेलंगरे उपस्थित होते.

संस्थेचे विद्यमान चेअरमन बलभिम राजाराम पावले आणि व्हाईस चेअरमन चंद्रकांत धर्माण्णा कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी ही विशेष सभा बोलाविण्यात आली होती. नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.

चेअरमन पदासाठी नारायण मच्छिंद्र देवकुळे यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी सविता संजय रणदिवे यांचा अर्ज दाखल झाला होता. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्याने अध्यासी अधिकारी एस. टी. तेलंगरे यांनी नारायण देवकुळे यांची चेअरमनपदी आणि सविता रणदिवे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडीची घोषणा होताच उपस्थित संचालक, सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन नारायण देवकुळे यांनी पतसंस्थेची आर्थिक प्रगती, सभासदांचे हित आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नूतन व्हाईस चेअरमन सविता रणदिवे यांनीही संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पतसंस्थेच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेस संस्थेचे संचालक बलभिम पावले, चंद्रकांत कोळी, तुकाराम कुलकर्णी, राजेंद्र सुभेदार, पांडूरंग कोले, सुनंदा देवकते, पांडूरंग बुरांडे, नारायण देवकुळे, सविता रणदिवे तसेच संस्थेचे सचिव सुरज सुधाकर तेली आणि सुशिलकुमार ढेकळे पाटील उपस्थित होते.

पतसंस्थेच्या या बिनविरोध निवडीमुळे संस्थेमध्ये एकमताचे वातावरण असल्याचे दिसून आले. मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पतसंस्थेचे सभासद तसेच विविध सामाजिक, सहकारी आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून नूतन चेअरमन नारायण देवकुळे आणि व्हाईस चेअरमन सविता रणदिवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संस्थेच्या आगामी वाटचालीत आर्थिक शिस्त, सभासदाभिमुख धोरणे आणि विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages