स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 23, 2026

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर हल्ला





निमगाव (कटूसत्य वृत्त):- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर शुक्रवार दि 19 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी निमगाव पाटी येथे  धारदार शस्त्र व रॉडने मारहाण करून प्राणघाटक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे अजित बोरकर हे रात्री आठच्या सुमारास आपल्या कार्यालया शेजारी फोनवर बोलत बेसावधपणे उभे असताना सफारी गाडीतून अज्ञात चार ते पाच इसमानी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    शेतकरी व शेतकरी आंदोलनासाठी संपूर्ण माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करीत असलेले अजित बोरकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थरोळ्यात असणाऱ्या अजित बोरकर यांना तात्काळ अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे अजित बोरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही व शनिवारी सायंकाळी 4  पर्यंत अकलूज पोलीस स्टेशनला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अजित बोरकर यांची तब्येत साधा स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा राजू शेट्टी हे रविवारी अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये अजित बोरकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येणार असून यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी आपली भूमिका जाहीर करतीळ असे सांगण्यात येत आहे यामुळे बोरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाने सतर्क भूमिका स्वीकारली असून अकलूजचे डी वाय एस पी वाळके व अकलूजचे पोलीस निरीक्षक उबाळे यांनी शनिवारी पहाटे हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली आहे शनिवारी दिवसभर बोरकर यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये लोकांची रीघ लागली होती.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages