'राजराजेश्वरी'च्या माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 22, 2026

'राजराजेश्वरी'च्या माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप

 'राजराजेश्वरी'च्या माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक प्रशालेतील २०१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील ५५ गरीब,गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका  वैशाली कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, सहशिक्षक शितलकुमार पाटील, विश्वनाथ तंबाके आदी उपस्थित होते. यावेळी बसवराज बडगा,भास्कर नामपल्ली,अनिल व्हनकेरी, लक्ष्मीकांत अंजनाळकर, किशोर मानसावाले,महेश बोमेन,राहुल नल्ला,राहुल सनके आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षण संकुलातील पहिली ते दहावीपर्यंतच्या ५५ गरीब, गरजू, होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर, कंपास पेटी, वह्या बूट असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. बसवराज बडगा व भास्कर नामपल्ली या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव व स्वतः गरीब परिस्थितीवर मात करून  शिक्षण कशी घेतले या विषयी माहिती सांगितले. आम्हाला हि तेव्हा दानशूरांकडून असेच शैक्षणिक साहित्य मिळाले होते.त्यामुळेच अत्ता आम्ही विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहोत.आम्हाला गरीबीची जाण असल्याचे सांगत यापुढेही शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या या शैक्षणिक साहित्यातून आज शिकणारे विद्यार्थी पुढे नक्कीच विविध क्षेत्रात चमकतील असे प्रतिपादन विजयकुमार हुल्ले यांनी केले.मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले, माजी विद्यार्थ्यांमुळेच शाळेचे नाव लौकिक झाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले. आपल्यासाठी शाळेची दार खुली असणार आहेत.आजच्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्याचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत कुरे सर यांनी केले तर मारुतीराव कांबळे यांनी आभार मानले. 
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल खाडे, बजरंग शिरसाट, महेंद्र वाघमारे, श्रेयस बिराजदार, वैशाली गुजर, चंद्रकांत पाटील, संगीता नरगीडे, भाग्यश्री महाजन, शशिकांत स्वामी, रोहित हत्तरगी , विश्वनाथ उंबर्गीकर नागेश कंळत्रे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages