अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत आयुक्त मा.डॉ सचिन ओम्बासे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दिनांक 29/05/2026 रोजी आयुक्त यांनी 29 नवी पेठ येथील सुरतवाला यांच्या जागेवरील तसेच शुक्रवार पेठ येथील जवाहर मोतीलाल शहा यांच्या C.S. No. 3994/क-2 या ठिकाणावरील अनधिकृत बांधकाम पाडकाम कारवाईची पाहणी केली.
यावेळी संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला तसेच अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेच्या धोरणानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरातील नियमबाह्य बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असेही मा. आयुक्तांनी यावेळी सांगितले.
सदर पाहणीवेळी निळकंठ मठपती व आनंद जोशी हे उपस्थित होते. तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित राहून कारवाईची माहिती देत होते.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी बांधकाम करताना महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेऊनच काम करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment