अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपये जमा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 23, 2026

अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपये जमा

 अखेर विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपये जमा

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय पेन्शन योजना आणि परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे पैसे मागील ऑगस्ट 2025 पासून त्यांच्या खात्यावर जमा झाले नसल्याची धक्कादायक माहिती सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनने समोर आणली होती. तसे निवेदनही युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण सोलापूर विभागाचे सहसंचालक डॉ. अजयकुमार जाधव यांना दिले होते.
त्यानुसार“विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचाऱ्यांचे कोट्यवधी रुपये रखडले,” असे वृत्त 20 मे रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने याची दखल घेत 21 मे रोजी कार्यवाहीही केली. एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत तफावत असल्यामुळे चलन जनरेट होत नव्हते. ही त्रुटी त्यांनी दूर केली. आणि सर्वांची ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सोलापूर विभागीय सहसंचालक कार्यालयाने 21 व 22 मे रोजी पूर्ण केली.
1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून कर्मचारी हिस्सा 10 टक्के आणि शासन हिस्सा 14 टक्के अशी एकूण 24 टक्के रक्कम कपात केली जाते. मात्र, मागील 9 महिन्यांपासून ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक ‌‘प्रान‌’ खात्यावर जमा झालेली नव्हती. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान आणि त्यांच्यात तीव्र संतापाचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याची दखल कॉलेज कर्मचारी युनियनने निवेदन देऊन केली होती तसेच सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांनीही एका पत्राद्वारे लक्ष वेधले होते. याची कार्यवाही न झाल्यास 27 मे पासून विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर विविध टप्प्यावर आंदोलन सुरू करण्याचा ईशारा सुटाचे अध्यक्ष डॉ. नेताजी कोकाटे व प्रमुख कार्यवाह डॉ. भगवान आदटराव यांनी दिला होता.  
-----
वृत्तपत्रातील प्रसिद्धीमुळे न्याय
सोलापूर विभागातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची
सुमारे 730 जणांची दरमहा पाऊने दोन कोटीची रक्कम ऑगस्ट 2025 पासून चलन जनरेट होत नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे जमा होती नव्हती. या त्रुटीसाठी 9
महिने झाले होते. परंतु याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाची यंत्रणा हलली. अखेर ही रक्कम जमा झाली आणि आम्हांला न्याय मिळाला. याबद्दल कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने आभार.
-दत्ता भोसले, अध्यक्ष कॉलेज कर्मचारी युनियन,  सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages