नेताजी प्रशालेचा दहावीचा ९१.४८ निकाल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

नेताजी प्रशालेचा दहावीचा ९१.४८ निकाल

 नेताजी प्रशालेचा दहावीचा ९१.४८ निकाल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचा दहावीचा ९१.४८ टक्के इतका  निकाल लागला. १९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, ६० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.प्रशालेतून सृष्टी बोरामणी ८८.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला .यशोदा पुजारी  ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर संतोष खराडे या विद्यार्थ्यांने ८५.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, ज्येष्ठ शिक्षक राजकुमार मरगुरे, राजेंद्र मुलगे, काशिनाथ माळगोंडे, शितल पाटील, बसवराज तेग्गेळी, शिवानंद पुजारी, प्रशांत स्वामी, रेवणसिद्ध दसले तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages