शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा दहावीचा निकाल ९१.७७ टक्के
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा निकाल ९१.७७ टक्के लागला. संस्थेच्या ३३ शाखेतून २६४८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले. यापैकी २४३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिजामाता कन्या प्रशालेची कु. सृष्टी अमोल दोशी हिने ५०० पैकी ४९६ गुण व ९९.२० टक्के मिळवित संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला.तर सदाशिवराव माने विद्यालय अकलूज ची कु. संस्कृती प्रदीप कोरेकर हिने ४८७ गुण व ९७.४० टक्के मिळवीत द्वितीय क्रमांक मिळवला.व महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर ची कु. समृद्धी अरुण बाबर हिने ४८५ गुण व ९७ टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.
जिजामाता कन्या प्रशालेतील कु. सृष्टी अमोल दोशी हिने संस्कृत व विज्ञान विषयात १०० गुण व कु. मुस्कान सलामत सय्यद हिने संस्कृत विषयात १०० गुण प्राप्त केले.
संस्थेच्या श्री समर्थ रामदास विद्यामंदिर, शिवथर या शाळेचा निकाल १०० टक्के लागला. जिजामाता कन्या प्रशाला अकलूज ९८.८७ टक्के, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय कोथरूड ९८.३६ टक्के, श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विझोरी ९७.३७ टक्के, श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली ९७.३७ टक्के, श्री गणेश विद्यालय पिंपळनेर ९६.०८ टक्के, मोरजाई विद्यालय मोरोची ९५.६५ टक्के, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर ९५.२४ टक्के, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर ९४.१७ टक्के, श्री काळभैरवनाथ विद्यालय गुरसाळे ९३.५५ टक्के, श्री हनुमान विद्यालय लवंग ९३.४८ टक्के, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज ९३.०६ टक्के, श्री शंभू महादेव विद्यालय उं. दहीगाव ९२.८६ टक्के, स.म. शंकराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर ९२.४५ टक्के, प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी ९१.४३ टक्के, सदाशिवराव माने विद्यालय मानकी ९१.३८ टक्के, श्रीनाथ विद्यालय लोंढे मोहितेवाडी ९१.१८ टक्के, श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय कोळेगाव ९०.९१ टक्के, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला व ज्यू. कॉलेज नातेपुते ९०.७४ टक्के, श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर ९०.३८ टक्के, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे ८८.८९ टक्के, कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यु. कॉलेज सदाशिवनगर ८८.७६ टक्के, श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी ८७.७६ टक्के, श्री पळशेश्वर विद्यालय पळसमंडळ ८५.७१ टक्के, कृष्णानंद विद्यामंदिर पाटीलवस्ती ८४.६२ टक्के, श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले ८४.२१ टक्के, श्री बाणलींग विद्यालय फोंडशिरस ८३.७१ टक्के, अकलाई विद्यालय अकलूज ८३.३३ टक्के, श्री चक्रेश्वर विद्यालय चाकोरे ८१.८२ टक्के, रामलिंग विद्यालय कुरबावी ७८.९५ टक्के, श्री संभाजीबाबा विद्यालय इस्लामपूर ७३.६८ टक्के, रात्र प्रशाला अकलूज ७३.६८ टक्के, मोहनराव पाटील विद्यालय बोरगाव ४० टक्के असा निकाल लागला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील, सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक मंडळ यासह विविध शाखेचे पदाधिकारी, मान्यवर आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment