नेताजी इंग्लिश मीडियमचा दहावीचा निकाल १००% टक्के
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडियमचा दहावीचा निकाल १००% टक्के इतका लागला.
१३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.प्रशालेतून ओंकार दावणे या विद्यार्थ्यांने ७४.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला . अरमान शेख या विद्यार्थ्यांने ६८.००% टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला तर श्वेता पिंडगुंडे या विद्यार्थिनीने ६४.००% टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना तेजस्विनी जोगिपेठकर,संगिता कुडक्याल, संपदा पोटाबत्ती, संतोष प्रचंडे, किर्ती बुरा, वैष्णवी साठे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन केले. यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, माजी प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदींनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment