जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये 'ऑनलाइन' प्रवेश प्रक्रिया सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 27, 2026

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये 'ऑनलाइन' प्रवेश प्रक्रिया सुरू

 जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये 'ऑनलाइन' प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाज कल्याण आयुक्तालयाच्या दि. 25.05.2026 च्या परिपत्रकानुसार सन 2026-27 करिता शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. निवास, भोजन, शैक्षणिक साहित्यासह सर्व सुविधा शासनाकडून 100% मोफत. विद्याथ्यांनी, http://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन.

ग्रामीण व दुर्गम भागातील कष्टकरी, शेतमजूर आणि मागासवर्गीय कुटुंबातील मुला-मुलींना शहराच्या ठिकाणी राहून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या परिपत्रक क्र.सकआ/शिक्षण/शावगू/वसतिगृह प्रवेश/2026-27, दिनांक 25.05.2026 अन्वये सोलापूर जिल्ह्यातील 16 शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेशाचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे 'ऑनलाइन' पद्धतीने राबविली जात असून पात्र विद्यार्थ्यांनी, http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुलोचना सोनवणे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक (सन 2026-27):

आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार स्थानिक शाळा व महाविद्यालयांच्या निकालानुसार प्रवेशाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

अभ्यासक्रम / वर्ग-शालेय विभाग (इयत्ता 8 वी)-
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 30 जून 2026 पर्यंत

इयत्ता 11 वी व 12 वी-ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-
15 जुलै 2026 पर्यंत

बीगर व्यावसायिक अभ्यासक्रम (पदवी
B.A./B.Com/B.Sc.)-  ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- दि.15 जुलै 2026 पर्यंत

व्यावसायिक अभ्यासक्रम इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, लॉ, पॉलिटेक्निक यांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक त्यांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनुसार स्वतंत्रपणे राहील.

सोलापूर जिल्ह्यातील 16 शासकीय वसतिगृहांची स्थितीः

जिल्ह्यात मुलांची 9 आणि मुलींची 7 अशी एकूण 16 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.

 मुलांची वसतिगृहे (एकूण 09): सोलापूर शहर (2), बार्शी (2), अक्कलकोट (1), माढा (1), पंढरपूर (1), करमाळा (1) आणि अकलूज (1).

मुलींची वसतिगृहे (एकूण 07): सोलापूर शहर (1), अक्कलकोट (1), मोहोळ (1), कुडूवाडी (1), बार्शी (1), पंढरपूर (1) आणि माळशिरस (1).
  वसतिगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जातो. यामध्ये निवास, दोन वेळचे सकस भोजन, नाश्ता, दूध, फळे, अंडी, आठवड्यातुन दोन वेळा मांसाहरी भोजन तसेच वह्या-पुस्तके, गणवेश, छत्री, रेनकोट, गमबुट इत्यादी शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा निर्वाह भत्ता जमा केला जातो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कौशल्याधारित विकासासाठी वसतिगृहात सुसज्ज ग्रंथालय आणि आधुनिक संगणक लॅबची सुविधाही उपलब्ध आहे.

 पात्रता आणि प्रवेशाचा निकष -

या शासकीय सुविधेचा लाभ अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विजाभज (VJNT) व विशेष मागास प्रवर्गातील (SBC), आर्थिक मागास, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना घेता येईल. सदरची सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर व सामाजिक आरक्षणावर आधारित असेल.

ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्यांनी कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर व संबंधित शहराच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांशी समक्ष भेटून मार्गदर्शन घ्यावे.

"उच्च शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू व गुणवंत विद्याथ्यर्थ्यांनी समाज कल्याण आयुक्तालयाच्या वेळापत्रकानुसार मुदतीत ऑनलाईन अर्ज भरून या सुविधेचा लाभ घ्यावा. केवळ आर्थिक परिस्थितीअभावी कोणाचेही शिक्षण सुटू नये यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे." अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages