गरीब कुटुंबांना दिलासा;मोहोळमध्य ‘शादीखाना’ उभारणीला हिरवा कंदील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

गरीब कुटुंबांना दिलासा;मोहोळमध्य ‘शादीखाना’ उभारणीला हिरवा कंदील

 गरीब कुटुंबांना दिलासा;मोहोळमध्य ‘शादीखाना’ उभारणीला हिरवा कंदील




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील मुस्लिम समाजासाठी प्रस्तावित ‘शादीखाना’ प्रकल्पाला गती मिळाली असून, नगरसेविका शहीनाज शौकत तलाफदार यांनी स्वतःची सुमारे १० गुंठे जागा नगरपरिषदेला मोफत बक्षीसपत्राद्वारे दिली आहे. यामुळे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून, या उभारणीसाठी सुमारे १ कोटी रुपयांचा विकास निधीही मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना युवानेते एजाज भाई तलफदार यांनी सांगितले की, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आ. राजन पाटील, यशवंत माने आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी नगरसेवक मुस्ताक शेख यांचीही मोलाची साथ लाभली आहे.

गरीब कुटुंबांना मोठा दिलासा आजच्या महागाईच्या काळात विवाहासाठी मंगल कार्यालय, डेकोरेशन, भाडे आणि इतर खर्चामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक ताण येतो. अनेक कुटुंबांना कर्ज घ्यावे लागते किंवा साधेपणाने विवाह करावा लागतो. प्रस्तावित ‘शादीखाना’मुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, सर्वसामान्य व गरजू कुटुंबांना सन्मानाने विवाह सोहळे पार पाडता येणार आहेत.

प्रशस्त व सुसज्ज सुविधा तक्षशिला सोसायटीच्या मागील बाजूस असलेली ही जागा प्रशस्त व मोकळी असून, येथे उभारण्यात येणारा शादीखाना आधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. पार्किंगसह इतर आवश्यक सोयी उपलब्ध होणार असून, विवाह व सामाजिक कार्यक्रमांसाठी उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.



सामाजिक उन्नतीस चालना हा प्रकल्प केवळ इमारत नसून समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सर्व स्तरातील नागरिकांना समान संधी उपलब्ध होऊन आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शॉपिंग कॉम्प्लेक्सही अंतिम टप्प्यात याच प्रभागात उभारण्यात येत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच त्याचेही उद्घाटन होणार असल्याची माहिती देण्यात आली.

वारशाची परंपरा कायम युवानेते एजाज तलफदार यांनी सांगितले की, त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष स्व. शौकत भाई तलफदार यांनी समाजाच्या विकासासाठी सातत्याने काम केले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages