लाखो किंमतीचे मोबाईल पोलिसांनी केले परत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

लाखो किंमतीचे मोबाईल पोलिसांनी केले परत

 लाखो किंमतीचे मोबाईल पोलिसांनी केले परत




नातेपुते (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गहाळ मोबाईल शोध मोहिमेअंतर्गत, नातेपुते पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक विशाल वायकर व पोलीस कर्मचारी यांनी तांत्रिक तपासाद्वारे ३ लाख रुपये किमतीचे एकूण १४ मोबाईल संच हस्तगत करून हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.संबंधित मूळ मालकांना आपला मोबाईल आपल्याला मिळाल्याने त्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता अनेक दिवसानंतर आपला मोबाईल आपल्याला मिळाल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे आभार मानले.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नातेपुते पोलीसांकडून तपासाला गती देण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गोपनीय विभागाचे गणेश कापसे, पो.ना. राकेश लोहार,  पो.ना. अमोल वाघमोडे, पो.कॉ. रणजीत मदने पो.कॉ. मनोज शिंदे यांनी तांत्रीक विश्लेशनाचा वापर करून या मोबाईलचा माग काढला. व हस्तगत करण्यात आलेला ३ लाख रुपयांचा मुद्देमाल ( १४ मोबाईल) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.याप्रसंगी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी नातेपुते येथील नागरिकांना आवाहन करून आपले मोबाईल गहाळ झाल्यास त्वरित नातेपुते पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याबाबत  सांगितले आहे


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages