रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वृक्ष भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 7, 2026

रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वृक्ष भेट

 रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वृक्ष भेट




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- टेंभुर्णी-विधान परिषदेचे मा. आमदार रणजितसिंहदादा मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे भेट घेऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी हार, तुरे, फेटे याऐवजी रोपटे आणावे, या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाना-भैय्या युवा मंचच्या वतीने विविध वनस्पती व वृक्ष भेट देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काॅग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख म्हणाले की, आमचे मार्गदर्शक मा.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठे बंधू रावसाहेब (नाना) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्यांना सोबत घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही विविध वृक्ष त्यांना भेट देण्यात आली. 
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती होऊन हरित भविष्य घडवण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा वारसा रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लाभला आहे. त्यांनी कायमच विकासात्मक दृष्टीकोन ठेवून राज्यात आणि जिल्ह्यात विकासकामे केली आहे. त्यांच्या हातून भविष्यातही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या सदिच्छा आम्ही दिल्या आहेत. 
यावेळी नाना-भैय्या युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages