लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे रानमसले येथे प्लास्टिकमुक्त परिसर अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 19, 2026

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे रानमसले येथे प्लास्टिकमुक्त परिसर अभियान

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे रानमसले येथे प्लास्टिकमुक्त परिसर अभियान 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समृद्ध गाव योजनेंतर्गत मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर येथे प्लास्टिकमुक्त परिसर अभियान राबविले. या उपक्रमांतर्गत रासेयो स्वयंसेवकांनी रानमसले येथील श्री ब्रह्मगायत्री मंदिर परिसरात स्वच्छता केली तसेच मंदिर परिसरातील प्लास्टिक गोळा केले. त्याचबरोबर त्यांनी मंदिरा परिसरात चाफ्याच्या दोन झाडांचे वृक्षारोपण केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सरकाळे व प्रा सायली बडेकर तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमासाठी रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षीरसागर व उपसरपंच रमेश सुतार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन तसेच संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख व सचिव डॉ.अनिता ढोबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages