कुमार व मुली गट राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सोलापूरात दोन जूनपासून - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

कुमार व मुली गट राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सोलापूरात दोन जूनपासून

 कुमार व मुली गट राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सोलापूरात दोन जूनपासून

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- कुमार व मुले गटाची ५२वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सोलापुरात किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने दोन जून पासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर ५ जूनपर्यंत होणार असल्याची माहिती किरण स्पोर्ट्स क्लब तथा स्पर्धा समितीच्या अध्यक्षा अलकाताई राठोड यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे  सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, संदीप तावडे, स्पर्धेचे मार्गदर्शक सुभाष चव्हाण, सचिन चव्हाण, नागेश बिराजदार, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, स्पर्धा समितीचे सचिव मोहन रजपूत व असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव राजाराम शितोळे आदी उपस्थित होते.

स्पर्धेसंबंधी अधिक माहिती सांगताना त्या म्हणाल्या, या स्पर्धेतील मैदानास स्वर्गीय अजितदादा क्रीडा नगरी असे असे नाव देण्यात आले आहे. या स्पर्धा सकाळी,  सायंकाळी व रात्री विद्युत झोतात होणार आहेत. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून यासाठी चार मैदाने तयार करण्यात आली आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दोन जून रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील खेळाडूंची निवास व्यवस्था नेहरूनगर येथील जय जवान जय किसान सैनिक स्कूल आणि गांधी आश्रम शाळा येथे तर मुलींची व्यवस्था आयडियल स्कूलमध्ये करण्यात आली आहे. सर्वांची भोजन व्यवस्था सुंदर मल्टीपर्पज हॉलमध्ये केली आहे.

 *महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ निवडणार*


महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव म्हणाले, या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातील  २४ कुमार व २४ मुलीचे असे ४८ संघातील खेळाडू,संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक आणि पंच पदाधिकारी असे १ हजार सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे कुमार व मुलीचे संघ निवडण्यात येणार असून हे संघ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या 45 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद व कुमार व मुली गटाच्या स्पर्धेत भाग घेतील. कार्याध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह राज्याचे निवड समितीचे सदस्य श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीन आक्रे (पालघर), नंदिनी धुमाळ (मुंबई ) हे महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ निवडतील.

या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, संदीप तावडे, स्पर्धेचे मार्गदर्शक सुभाष चव्हाण, सचिन चव्हाण, नागेश बिराजदार, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, स्पर्धा समितीचे सचिव मोहन रजपूत व असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव राजाराम शितोळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages