आम्हीही सत्तेमध्ये आहोत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी केली तर खपवून घेणार नाही
उदय सामंतांचा भाजपला टोला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असलीत तर ते खपवून घेणार नाही. शिवसेना अशाने नामोहरम होणार नाही असा टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला.
यावरुन शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसत आहे. सोमवार टू सोमवार मुंबईत येऊन दुकानदारी नको, असे म्हणत उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांचेही कान टोचल्याचं पाहायला मिळालं.
सोमवार टू सोमवार मुंबईला येऊन दुकानदारी करणे बंद करा
अनिवासी भारतीय सारखे पदाधिकारी उपयोगाचे नाहीत. सोमवार टू सोमवार मुंबईला येऊन दुकानदारी करणे बंद करा. शिंदे साहेब हे कधीही खपवून घेणार नाहीत. कॅबिनेटमध्ये मंत्री बसतात की पदाधिकारी हा प्रश्न पडू लागला आहे अशा शब्दात उदय सामंत यांनी टेभुर्णीतील पदाधीकारी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान खेचले. सोलापूर जिल्हातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोण दमबाजी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असलीत तर आम्ही खपवून घेणार नाही असे स्पष्टपणै ठणकावून सांगताना मी जाण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांना सूचना करून जाणार असल्याचे सांगितले. यावरून सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आता पुन्हा समोर येऊ लागले आहे.
आम्हीही सत्तेमध्ये असून नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विचाराला पाठिंबा देत आहोत
आम्हीही सत्तेमध्ये असून नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विचाराला पाठिंबा देत आहोत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना कोणी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असेल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिला. अशा गोष्टीने शिवसेना ना मोहरम होत नसते असा इशारा भाजपला दिला. या सर्व प्रकारातून सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, आज रात्रीपर्यंत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येईल. 17 विधान परिषदेच्या जागा आहेत आणि 17 च्या 17 जागा जिंकू असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला. शेवटी शिंदे साहेबांसोबत चर्चा करू विषय सोडवू कोंकणात आमचे मतदार जास्त आहेत इथे राष्ट्रवादीने क्लेम केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत ह्या गोष्टी होत असतात आमचे नेते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्ग करण्यास सक्षम आहेत. चर्चा खूप होत असतात शेवटी जेव्हा आम्ही फॉर्म भरू तेव्हा तुमच्या तो आकडा लक्षात येईन असे सामंत म्हणाले.
No comments:
Post a Comment