उद्योगमंत्री सामंत यांचा शिवशंभु प्रेमी व शिवसैनिक यांच्या वतीने भव्य सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 29, 2026

उद्योगमंत्री सामंत यांचा शिवशंभु प्रेमी व शिवसैनिक यांच्या वतीने भव्य सत्कार

 उद्योगमंत्री सामंत यांचा शिवशंभु प्रेमी व शिवसैनिक यांच्या वतीने भव्य सत्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आले असता, सोलापुरातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 'शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती', 'छात्रवीर प्रतिष्ठान', 'शिवछत्रपती सामाजिक संघटना' आणि सोलापूरच्या शिवसैनिकांच्या वतीने उदयजी सामंत साहेबांना छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मूर्ती आणि शाल देऊन अत्यंत उत्साहात सन्मानित करण्यात आले.
​या सोहळ्याला शिवसेनेचे प्रमुख नेते व मा.खासदार राहुल शेवाळे, सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख तथा खासदार धैर्यशील माने, सोलापूरची लेक तथा खासदार ज्योतीताई वाघमारे, ज्येष्ठ नेते सिद्धराम म्हेत्रे, मार्गदर्शक अमोलबापू शिंदे,अमरजी पाटील, नगरसेवक प्रियदर्शन साठे तसेच शिवसेनेचे सन्माननीय नेते पदाधिकारी आदी प्रमुख नेत्यांची सन्माननीय उपस्थिती होती.
​याप्रसंगी शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेड चे महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे, ज्योतिबा गुंड, शिवराज विभुते आणि प्रशांतजी देशमुख यांच्यासह सोलापूर शिवसेना शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या मेळाव्यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूरच्या शिवसैनिकांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीवर भर दिला. तसेच, विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत केलेल्या या आदराबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे व शिवसैनिकांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमामुळे सोलापूर शिवसेनेमध्ये एक नवा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages