जिल्हास्तरावर कार्यरत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 20, 2026

जिल्हास्तरावर कार्यरत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती

 जिल्हास्तरावर कार्यरत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९  व सुधारित नियम १९९५  अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती कार्यरत आहे. समितीचे मुख्य कार्य अनुसूचित जाती व जमाती समाजावरील अत्याचार प्रकरणांचा आढावा घेणे, गुन्ह्यांच्या तपास व न्यायालयीन प्रक्रियेवर देखरेख ठेवणे, पीडितांना शासनाकडून देण्यात येणारे अर्थसहाय व पुनर्वसन योजनेची अंमलबजावणीचा आढावा घेणे तसेच अत्याचार प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सुचविणे होय, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीमध्ये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून सहायक आयुक्त समाज कल्याण हे सदस्य सचिव तर पोलिस अधिक्षक, पोलिस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.
प. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग, जिल्हा सरकारी अभियोक्ता हे सदस्य असतात, तसेच सदर समितीवर शासन निर्णय क्रमांक जिदनिस १०९५/प्र.क्र. १२३/मावक-२/मुंबई दि.०७ डिसेंबर 1995 अन्वये मा. पालकमंत्री यांच्या मान्यतेने अशासकीय संस्थामधील अनुसूचित जाती, जमातीचे ५  व बिगर मागासवर्गीय समाजातून ३ अशासकीय सदस्य यांची नियुक्ती करणेबाबत निर्देशित आहे. त्यानुसार मा. पालकमंत्री यांचे मान्यतेने अशासकीय संस्थामधील अनुसूचित जाती व जमातीचे ५  व बिगर मागासवर्गीय समाजातून २  अशा एकूण सात अशासकीय सदस्यांची मा. जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सोलापूर यांनी नियुक्ती केलेली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीमध्ये सर्व नवनियुक्त अशासकीय सदस्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन श्रीम. सुलोचना सोनवणे, सदस्य सचिव जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती तथा सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages