महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 20, 2026

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर

 महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  मा. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे पत्र दि. १८ मे २०२६ अन्वये महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून, आज सोमवार दि. १८ मे २०२६ पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
* निवडणूक कार्यक्रमानुसार अधिसूचनेची प्रसिद्धी सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी होणार आहे.
* नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. १ जून २०२६ आहे.
* नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार दि. २ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
* उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख गुरुवार दि. ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
 • मतदान गुरुवार दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
* मतमोजणी सोमवार दि. २२ जून २०२६ रोजी करण्यात येईल.
* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख गुरुवार दि. २५ जून २०२६ आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages