न्यासाच्या उल्लेखनीय कार्यामुळे भक्तांना सोयी सुविधा एकाच छताखाली मिळत आहे- कृष्णराज महाडिक
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे भक्तांना विविध सोयी सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याचे मनोगत भिमा सहकारी साखर कारखान्याचे (सिकंदर टाकळी, ता. मोहोळ) मार्गदर्शक संचालक व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या समवेत भाजपचे पदाधिकारी प्रदीप पाटील, महेश बिराजदार, सिद्धार्थ पाटील, अमोल महाडिक आदिजन उपस्थित होते.
याप्रसंगी मनोज निकम, सौरभ मोरे, वैभव मोरे, प्रवीण देशमुख, शुभम सावंत, किरण साठे, विनायक भोसले, विशाल कलबुर्गी, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment