हणमंत पडवळ काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

हणमंत पडवळ काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत

 हणमंत पडवळ काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काव्यप्रेमी शिक्षक मंच आयोजित काव्यप्रेमी साहित्य, संस्था, प्रेरणा व शि.क.बा.पुरस्कार वितरण सोहळा नुकताच लोकमान्य टिळक सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय किल्ला बागेसमोर सोलापूर येथे पार पडला. मा.प्रा. प्रकाश तानुबाई अण्णा महानवर (कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर ) यांचे शुभहस्ते आणि डॉ.इ.जा. तांबोळी (जेष्ठ साहित्यीक तथा प्राचार्य सोशल महाविद्यालय सोलापूर ), यांचे अध्यक्षतेखाली व डॉ. सुहास पुजारी ( जेष्ठ समीक्षक व साहित्यीक )आणि मा. पद्माकर कुलकर्णी,(राज्य प्रतिनिधी मसाप पुणे) यांच्या उपस्थित पार पडला . विविध साहित्य कलाकृती, संस्था तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच साठी विशेष कार्य करणाऱ्या काव्यप्रेमी शिक्षक साहित्यीक यांना प्रेरणा पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये धाराशिव येथील कवी, साहित्यीक वात्रटिकाकार हणमंत पडवळ यांना त्यांच्या साहित्य सेवा आणि मंचासाठी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages