कुमठे प्रशालेचा निकाल 81.74 टक्के - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

कुमठे प्रशालेचा निकाल 81.74 टक्के

 कुमठे प्रशालेचा निकाल 81.74 टक्के



 
 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशालेने  दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली असून प्रशालेचा दहावी बोर्डाचा निकाल 81.74 टक्के लागला असून प्रशाले मधून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी 9, प्रथम श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी 36, द्वितीय श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी 36 व  सर्वसाधारण उत्तीर्ण  22 आहेत.
       प्रशाले मधून प्रथम- अनुराग फुलारी 91. 00 टक्के, द्वितीय - अंकिता घोडके 90.60 व तृतीय - ऋतुजा जाधव 89.7 टक्के गुण प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. 
              या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने,संस्थेचे मुख्य विश्वस्त व नगरसेवक जयकुमार माने व विश्वस्त स्वातीताई माने यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले करण्यात आले या प्रसंगी प्रशाले चे प्राचार्य जयसिंग गायकवाड,पर्यवेक्षक वसंत गुंगे, लिटल स्टार च्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी पवार व मलकारी कोरे  उपस्थित होते.
                या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विजयसिंह क्षीरसागर, संजय घोडके, परमेश्वर कोळी व नितीनकुमार लावंड  या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages