नगरसेवक‎ किसन जाधव यांच्याकडून‎ पालकमंत्री‎ गोरे‎ यांना संविधानाची‎ प्रतिमा‎ भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

नगरसेवक‎ किसन जाधव यांच्याकडून‎ पालकमंत्री‎ गोरे‎ यांना संविधानाची‎ प्रतिमा‎ भेट

 नगरसेवक‎ किसन जाधव यांच्याकडून‎ पालकमंत्री‎ गोरे‎ यांना संविधानाची‎ प्रतिमा‎ भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-‎ भारतीय घटनेचे‎ शिल्पकार‎ महामानव‎ डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर‎ यांच्या १३५‎ व्या‎ जयंतीनिमित्त‎ पार्क‎ चौक‎ येथील त्यांच्या‎ पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग क्रमांक २२ चे‎ भाजपाचे‎ नगरसेवक किसन‎ जाधव यांनी‎ जिल्ह्याचे पालकमंत्री‎ जयकुमार‎ भाऊ‎ गोरे यांना भारतीय‎ संविधानाची प्रतिमा‎ भेट देत‎ आंबेडकरांच्या‎ विचारांना‎ अभिवादन‎ केले.‎ या‎ वेळी अक्कलकोटचे पाणीदार‎ आमदार‎ सचिन‎ दादा‎ कल्याणशेट्टी,‎ सोलापूर शहर‎ मध्यचे‎ युवा आमदार देवेंद्र दादा‎ कोठे, महापौर विनायक दादा‎ कोंड्याल, भाजपा‎ शहराध्यक्षा‎ रोहिणीताई‎ तडवळकर, भाजपा‎ नेते शहाजी पवार,‎ नगरसेवक गणेश‎ वानकर,‎ स्वीकृत‎ नगरसेवक‎ मनीष केत, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम,‎ संजय भंडगे,‎ संतोष ऋतिक‎ गायकवाड, माणिक‎ कांबळे,‎ महादेव‎ राठोड, यल्लाप्पा शिवपुरीआदी मान्यवर उपस्थित‎ होते.‎ यावेळी पालकमंत्री नामदार‎ जयकुमार‎ भाऊ गोरे‎ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी‎ देशाला दिलेले‎ संविधान‎ हे भारतीय लोकशाहीचे‎ भक्कम अधिष्ठान आहे.‎ समानता,‎ स्वातंत्र्य आणि बंधुता‎ या मूल्यांवर‎ आधारित असलेले संविधान‎ प्रत्येक‎ नागरिकाला‎ न्याय देण्याचे काम‎ करते.‎ संविधानाचा‎ आदर‎ राखणे आणि त्याच्या तत्वांचे‎ पालन‎ करणे‎ ही‎ प्रत्येकाची‎ जबाबदारी‎ आहे,‎ असे त्यांनी सांगितले.‎ नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले की,‎ डॉ‎ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‎ संविधानाची प्रतिमा भेट देण्यामागील‎ उद्देश म्हणजे समाजात संविधानाबद्दल‎ जागृती निर्माण करणे हा‎ आहे.‎ आजच्या‎ पिढीने संविधानातील‎ मूल्ये‎ जाणून घेत‎ त्यानुसार आचरण‎ करणे‎ गरजेचे आहे,‎ असेही त्यांनी नमूद‎ केले.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages