अनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत अखंड वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य महादेव चोपडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगरसेवक बालाजी भडकवाड उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगितले.
जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून कार्यक्रमाला रंगत आणली.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, कला विभाग प्रमुख रमेश चव्हाण, विज्ञान विभाग प्रमुख गोरख गायकवाड यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले, तर सोमनाथ ढोले यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:
Post a Comment