माढा शहरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय झाले मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

माढा शहरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय झाले मंजूर

 माढा शहरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय झाले मंजूर




आ. अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

माढा (कटूसत्य वृत्त):- सतत माढा मतदारसंघाच्या नवनवीन योजना व प्रकल्प मांडण्यामध्ये आमदार अभिजीत पाटील हे नेहमीच कार्यरत असताना दिसत आहेत परंतु माढा शहरात जिल्हा व सत्र न्यायालय मंजूरीसाठी आमदार अभिजीत पाटील हे सतत प्रयत्न करत असल्याने आनंदाची बाब म्हणून माढा तालुक्यासाठी हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. माढा परिसरातील नागरिकांना आता बार्शीला जाण्याची गरज उरणार नाही, ज्यामुळे वेळ आणि पैशांची बचत देखील होईल.

प्रलंबित खटल्यांचा निपटाराअतिरिक्त जिल्हा न्यायालय झाल्यामुळे स्थानिक पातळीवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे आणि दिवाणी खटल्यांचे कामकाज जलद गतीने चालण्यास मदत होईल. वकिलांसाठी सोय स्थानिक वकिलांना आता माढ्यातच जिल्हा स्तरावरील कामकाज पाहण्याची संधी मिळेल.

आमदार अभिजीत पाटील यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आणि त्यानंतरही मतदारसंघातील प्रशासकीय सोयीसुविधांसाठी सतत प्रयत्न केले होते. या न्यायालयाच्या मंजुरीमुळे माढा शहराच्या वैभवात भर पडली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयामुळे माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला असून, आता गंभीर स्वरूपाच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी सोलापूरला जाण्याची गरज उरणार नाही.

आमदार अभिजीत पाटील यांची प्रतिक्रिया:

"माढ्यातील जनतेला न्याय मिळवण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागू नये, हे आमचे ध्येय होते. या न्यायालयाच्या मंजुरीमुळे माढ्याचा प्रशासकीय दर्जा उंचावला आहे. हे न्यायालय लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे आणि पायाभूत सुविधांचे कामही आम्ही प्राधान्याने पूर्ण करून घेऊ." यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. 
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माढा शहर आणि तालुक्यातील नागरिक, वकील संघ आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आमदार अभिजीत पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages