लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 30, 2026

लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्टतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न



अकलूज (कटूसत्य वृत्त):- नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील नृसिंह जयंती नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान ट्रस्ट व जे.एफ.अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी धाराशीव रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव प्रविणराव काळे,विश्वस्त अभयकुमार वांकर,प्रमोद दंडवते उपस्थिती होते.
             एक सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण शंभरहून आधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबीरात प्रामुख्याने नेत्र तपासणी आणि दंतचिकित्सा तपासणी करण्यात आली.या तपासणी शिबिरात  बारा रूग्णांना मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले आहे.नेत्र तपासणीनंतर ३६ रूग्णांना मोफत चष्माचे वाटप करण्यात आले.12 मोतीबिंदू बाधित रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली आहे.या रुग्णांवर लवकरच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लक्ष्मी- नृसिंह देवस्थान ट्रस्टच्या वतीने पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत.जनसेवा हिच ईश्वर सेवा समजून या आरोग्य शिबीराची सेवेची दहा वर्षांची परंपरा ट्रस्टने अविरतपणे सुरू ठेवली आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवात अशा प्रकारच्या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला जातो.या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शिबिराच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
                 या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी सेवा ट्रस्टचे माजी सचिव प्रमोद दंडवते,डॉ. शिवानी मेनकुदळे,शिवरुद्र इसाके, सौरभ बनसोडे,नंदकुमार पाटील तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages