दर्गनहळळी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाची सत्ता
शिवा विश्वनाथ गायकवाड यांचा 167 मतांनी दणदणीत विजय
दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दर्गनहळळी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजप समर्थित उमेदवार शिवा विश्वनाथ गायकवाड यांनी तब्बल 167 मतांनी शानदार विजय संपादन करत प्रतिस्पर्धी कल्लाप्पा भिवा चतुरभूज यांचा पराभव केला.
या दणदणीत विजयामुळे दर्गनहळळी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाची सत्ता कायम राहिली असून गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच समर्थक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी जल्लोष करत विजय साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळण आणि अभिनंदनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
नवनिर्वाचित सरपंच शिवा विश्वनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. गावातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या विजय सोहळ्यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, शंकर बिराजदार, नवराज होनमुर्गीकर, विनोद बिराजदार, बद्रीनाथ बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार बाबुगोळू, चन्नवीर होनमुर्गीकर, सोमनाथ सरसबे, माणिक नुले, सुनील पाटील, जगदीश होनमुर्गीकर, मल्लिनाथ केगावकर, पंकज माळी, शराणाप्पा पाटील, राहुल कांबळे, तानाजी सलावदे, परमेश्वर पाटील, सिद्धाय्या स्वामी, सागर बिराजदार, वर्धशंकर कोळी, संजय होनमुर्गीकर, गंगाराम पाटील, अमोल बिराजदार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शिवा गायकवाड यांचे अभिनंदन करत हा विजय गावातील एकजूट, विश्वास, विकास आणि भाजपाच्या कार्यपद्धतीवरील जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले.
दर्गनहळळी ग्रामपंचायतीवरील हा विजय आगामी काळात गावाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:
Post a Comment