महात्मा फुले हे कर्ते सुधारक : प्रशांत सरुडकर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- संघर्ष करायचा असेल तर या देशातील लोकांना सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. तरच लोकांमध्ये परिवर्तन होईल. महात्मा फुले हे कर्ते सुधारक होते. १८५१ मध्ये पहिली शाळा महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये सुरू केली. या देशातील शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे यासाठी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंच्या साहित्याने या देशात क्रांतिकारक बदल झाले. प्रत्येक क्षेत्रामध्ये महात्मा फुले यांनी आपला ठसा उमटवलेला आसल्याचे मत व्याख्याते प्रशांत सरुडकर यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यान दरम्यान बोलत होते.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नगरसेवक बी वाय राऊत, मुख्याधिकारी विकास शिंगाडे, रिपाई नेते एन के साळवे,ज्येष्ठ नेते अर्जुन जठार,चेअरमन अंबादास बरडकर,सुनील साळवे,उत्तम बरडकर, राजकुमार हिवरकर,अशोक राऊत, नवाज सोरटे,सदाशिव काळे, प्रवीण काळे,संघर्ष सोरटे उपस्थित होते. यावेळी रणजीत जठार, मुख्याधिकारी विकास शिंगाडे, एन के साळवे, सुनील साळवे, राजकुमार हिवरकर, अभिजीत वाळके यांनी आपले मनोगते व्यक्त केली. उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उत्तम बरडकर यांनी मानले. कार्यक्रमास मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment