अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 अकलूज येथील रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद




अकलूज (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरत्न शिक्षण संस्था आणि श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथील शिवरत्न नॉलेज सिटीमध्ये भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला.मेळाव्याचे उद्घाटन शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या रोजगार मेळाव्यात एकूण  युवक-युवतींनी सहभाग नोंदवून विविध नामांकित कंपन्यांतील रोजगाराच्या संधींचा लाभ घेतला. जवळपास २३ प्रतिष्ठित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता.

यामध्ये भारत फोर्ज, बारामती; डार्कटेक प्रा. लि., पुणे; क्यूडटास टेक्नॉलॉजी, पुणे; इक्विटास बँक, अकलूज; आयडीएफसी बँक, अकलूज; पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि., बारामती; कॉटनकिंग, बारामती; धनस्मृती टेक्सटाइल्स प्रा. लि., झरे (करमाळा); नेक्सा मारुती सुझुकी, अकलूज; शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, विजोरी; शिवशंकर बाजार, अकलूज; यश सुझुकी, अकलूज; मेडिकल सेक्टर, अकलूज; एनआरपी कन्सल्टंट्स, पुणे; बीगॉस प्रा. लि.; वीटेक कन्सल्टंट्स प्रा. लि. आदी कंपन्यांचा समावेश होता.

यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, कु इशिता मोहिते पाटील,इतर सर्व संचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम विशेष ठरला. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना योग्य दिशा देण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

दोन्ही संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत तरुण पिढीच्या भविष्याचा विचार करून घेतलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages