राजेंद्र राऊत यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य व भविष्य,त्यांना अनेक पद मिळतील - मुख्यमंत्री फडणवीस
बार्शी (कटूसत्य वृत्त):- पुराणा मध्दे श्री भगवंताचे मोठे महत्व आहे. पुराणामध्ये याचा उल्लेख आहे.बार्शीला मोठी ऐतिहासिक व पौराणिक परंपरा आणि ठेवा लाभलेला आहे. तो पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि याला आणखीन मोठे रूप येण्यासाठीव श्री भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा राजेंद्र राऊत यांनी सादर केला आहे. त्याला सरकार पूर्ण समर्थन देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैशाख शुध्द द्वादशीला श्री भगवंत प्रकटदिन दरवर्षी उत्साहात साजरा होतो. मंगळवार दि. २८ रोजी या भगवंत प्रकट दिन सोहळयाच्या निमीत्ताने बार्शी येथे आल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जि प अध्यक्ष दीपक वैद्य, अर्चना पाटील, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले उप नगराध्यक्ष रोहित पाटील वर्षा झाडबुकेआदी उपस्थित होते. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विधानपरिषद उमेदवारीबाबत त्यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही. वरिष्ठ पातळीवर हे निर्णय होतात असे त्यांनी सांगितले. परंतु राजेंद्र राऊत यांना भविष्यात मोठी पद मिळतील त्यांचे भविष्य उज्वल आहे असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात राऊत यांनी मोठे यश मिळवले त्याबद्दल त्यांनी राऊत यांचे कौतुक केले. आणि विधानसभेला मतदारांनी केलेली चूक दुरुस्त करून राऊत याना भरभरून प्रेम दिले असेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment