अभिजित वाळके यांच्या स्वखर्चातून नातेपुते येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 23, 2026

अभिजित वाळके यांच्या स्वखर्चातून नातेपुते येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा

 अभिजित वाळके यांच्या स्वखर्चातून नातेपुते येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून नातेपुते येथे एका नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला. बसस्थानकाच्या शेजारील दुर्लक्षित आणि अस्वच्छ जागेचा कायापालट करून सामाजिक कार्यकर्ते अभिजित वाळके यांनी स्वखर्चातून ज्येष्ठ नागरिक वाचन कट्टा निर्माण केला असुन या वाचन कट्ट्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
नातेपुते बसस्थानकाचा शेजारील भाग गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होता. या ठिकाणी नागरिक कचरा टाकत होते. अभिजित वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या जागेची स्वच्छता करून घेतली. तिथे मुरूम टाकून जागा सुशोभित केली, तसेच ज्येष्ठ  नागरिकांना बसण्यासाठी बाकडांची व्यवस्था करून एक सुंदर वाचन कट्टा उभारला.वयोवृद्ध नागरिकांना सकाळी किंवा संध्याकाळी बसण्यासाठी - हक्काची आणि शांत जागा मिळावी, त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण  व्हावी, या हेतूने या कट्ट्याची निर्मिती करण्यात आली.याप्रसंगी अभिजीत वाळके, राजाराम काळे, अरुण उराडे, छगन मिसाळ, बबन वनवे, हनुमंत सोरटे, राजेंद्र खरे, अशोक नारायणे, दिलीप धाईजे, सुनील साळवे, युवराज वाघमारे, श्रावण सोरटे, दत्तात्रय सोरटे, नवाज सोरटे, गुलाब नदाफ, देवेंद्र सोरटे, अमृत अडसूळ, किसन काळे, नामदेव पांढरे, दादा साळवे, हरिदास कसपटे, वसंत पवार, पांडुरंग बोराटे यांची उपस्थिती होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages