24 ते 26 एप्रिल सहकार भारतीचे नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 23, 2026

24 ते 26 एप्रिल सहकार भारतीचे नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो

24 ते 26 एप्रिल सहकार भारतीचे नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो





सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महिलांचे संघटन आणि महिलांचा आर्थिक विकास या हेतुने सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो फॉर वुमेन एम्पावरमेंट या संकल्पनेतून महिलांकडून उत्पादित वस्तुचे प्रदर्शन आणि विक्री नॉर्थकोट मैदानावर दि. 24 ते 26 एप्रिल या दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती या एक्स्पोच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.
   कला, स्वाद व संस्कृतीचा अनोखा संगम या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून अनुभवायला येणार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल या धर्तीवर या व्हिजन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून महिलांकडून उत्पादित वस्तुला व्यासपीठ मिळावे म्हणून या प्रदर्शनातील स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मध्ये महिलांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी केले.
दि. 24 एप्रिल रोजी या व्हिजन एक्स्पोचे उदघाटन आ.चित्रा वाघ यांच्या हस्ते होणार असून यावेळी महापौर विनायक कोंड्याल,  दि. 26 एप्रिल रोजी याचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. महिलांसाठी असणार्‍या साड्या, ड्रेस, विविध प्रकारचे आभुषणे, पर्स पासून ते सर्वच वस्तु तसेच खाद्य पदार्थ असा या व्हिजन एक्स्पो मध्ये सहभाग असणार आहे. तसेच महिलांसाठी परिसंवादाचेही यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील  विविध जिल्ह्यातील महिलांकडून यामध्ये स्टॉल्स लावण्यात येणार आहे. याचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा.
  बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उद्धार हे ब्रीद घेवून काम करणार्‍या सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने महिलांना सक्षम करण्याचा या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. नॉर्थकोट मैदानावर जवळपास 100 पेक्षा अधिक स्टॉल्स महिलांना मोफत उपलब्ध होणार आहेत. सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुर्यकांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष किरण करकमकर, महामंत्री यशवंत बुर्‍हाडे, कार्यक्रम प्रमुख प्राची धामणगांवकर, सुजाता इनामदार,डॉ. जयंत शेळगीकर, अर्चना कुलकर्णी, श्रृती पवार, हनुमंत कोळी, आरती पानगांवकर,कुमुद अंकाराम यांच्यासह सहकार भारतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या व्हिजन एक्स्पोच्या यशस्वीतेसाठी काम करीत आहेत.


चौकट -
महिला बालकल्याण मंत्री मेघना बोर्डीकर, चित्रा वाघ यांची उपस्थिती राहणार
या व्हिजन एक्स्पोला राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री मेघना बोर्डीकर तसेच आ.चित्रा वाघ, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, शहाजी पवार, सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटक शरद जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

परिसंवाद -
राज्यातील विविध तज्ञ महिलांचा सहभाग असलेला परिसंवाद यामध्ये होणार आहे. 

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages