राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नियोजित स्मारकास तात्काळ निधी द्यावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 21, 2026

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नियोजित स्मारकास तात्काळ निधी द्यावा

 राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नियोजित स्मारकास तात्काळ निधी द्यावा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नियोजित स्मारकास तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करण्यासाठी (हायड्रोलिक शिडी) अथवा एल टाईप शिडी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे निवेदनेद्वारे करण्यात आली आहे. 
उपमहापौर झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या सत्कार करण्यात आला. 
सोलापूर शहरांमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या कुठेच पुतळा किंवा स्मारक नाही याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार निवेदन आंदोलन द्वारे सतत पाठपुरावा सुरू असून नुकतेच सोलापूर महानगरपालिकेने चार हुतात्मा पुतळ्याजवळील  मोकळी जागा ही राष्ट्रमाता जिजाऊ यांची स्मारक होण्यासाठी ठराव मंजूर केलेला आहे तरी त्या दृष्टीने राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मारक होण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात यावी व शासन दरबारी पाठपुरावा करण्यात यावा.

तसेच सोलापूरच्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आहे हा 12 फुटी भव्य पुतळा असून संभाजी महाराज जयंती निमित्त पुण्यतिथी निमित्त व राज्याभिषेक दिनानिमित्त व इतर कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी एल टाईप शिडी (हायड्रोलिक शिडी) नसल्याकारणाने अनेक शिवभक्त नाईलाजाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढून पुष्पहार अर्पण करतात हे अत्यंत धोकादायक आहे यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा नकळत आवमान तर होतोच पण त्याचबरोबर पुष्पहार घालत असताना एखादा शिवभक्ताचा पाय घसरून पडून प्राणालाही मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तात्काळ 14 मे  छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या आधी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी एल टाईप शिडी अथवा हायड्रोलिक शिडी उभारण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने खूप महापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे करण्यात आली. 
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष इर्शाद नागोरे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर आधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages