रंगभरण स्पर्धेचे आज बक्षिस वितरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आज बक्षिस वितरण होणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे यांनी दिली.
हा कार्यक्रम प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने,चित्रकार नितीन खिलारे,सुनिल चव्हाण,संजीव चाफाकरंडे,उल्हास बिराजदार,सोमेश्वर याबाजी,सचिन चौधरी,अ.गफुर अरब व वल्लभ चौगुले हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. समाजकल्याण केंद्र,रंगभवन येथे दुपारी ४.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.शिवजयंतीनिमित्त चार गटात ही स्पर्धा पार पडली होती.९ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणर आहे.या कार्यक्रमास सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल गायकवाड, संतोषकुमार माशाळे,समीर शेख,दिपक डांगे,अतुल नारकर,निलेश पवार,बरगली लांडगे,धन्यकुमार स्वामी,नारायण पवार,किरण गाटे यांनी केले.

No comments:
Post a Comment